Crime News pudhari photo
बीड

Beed Crime News : तीन वाळूमाफियांना पोलिसांचा दणका; हर्सुलला रवानगी

बीड जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, तीन वाळूमाफियांना एमपीडए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Police crack down on three sand mafia members; sent to Harsul

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, तीन वाळूमाफियांना एमपीडए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली. तिघांचीही हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली आहे.

चकलंबा पोलिसांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील अक्षय महादेव इमडे (वय 28) याच्याविरुद्ध वाळूमाफिया या सदराखाली एमपीडीए प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 23 जुलै रोजी या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर 29 जुलै रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर 30 जुलै रोजी त्याला हर्मूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

तलवडा पोलिसांनी माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील गोविंद चंद्रहास गोबरे (वय 30) याच्याविरुद्धही एमपीडीए प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.

त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गोबरे याला ताब्यात घेतले. तलवडा पोलिसांनी त्याला हर्मूल कारागृहात हजर करून स्थानबद्ध केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गद-र्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT