Parli Vaijnath E-Governance Pudhari
बीड

Parli Vaijnath Municipal Council | परळी नगर परिषदेचे ठराव आता एका क्लिकवर: 'या' संकेत स्थळावर पहा इतिवृत्त

सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली

पुढारी वृत्तसेवा

Parli Vaijnath E-Governance

परळी वैजनाथ: परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा युएलबी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. नगर परिषदेचे ठराव अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.

आता नगर परिषद सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे इतिवृत्त ऑनलाइन प्रसिद्ध होणार आहे. या माध्यमातून कामकाजात पारदर्शकता आणली गेली आहे.आता घरबसल्या नगर परिषदेचे निर्णय नागरिकांना पाहता येणार आहेत. सर्व ठराव आता कायमस्वरूपी ऑनलाईन स्वरूपात जतन केले जाणार आहेत.नगर परिषदेच्या या निर्णयामुळे शहरात होणारी विकासकामे, मंजूर निधी आणि प्रशासकीय निर्णय यांची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर येणार आहे.

परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजातील ऑनलाईन इतिवृत्तांमध्ये प्रामुख्याने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली सर्वसाधारण सभा आणि २० एप्रिल २०२६ रोजी पार पडलेली स्थायी समितीची सभा यांचे सविस्तर इतिवृत्त आणि ठराव पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. यापुढील सर्व ठराव व इतिवृत्ते लोकप्रतिनिधी व नागरिकांना एका क्लिकवर ऑनलाईन पाहता येणार आहेत.

लोकप्रतिनिधी व नागरिकांनी https://mahaulb.in या संकेतस्थळावर जाऊन 'बीड' जिल्हा निवडावा, त्यानंतर 'परळी वैजनाथ नगर परिषद' निवडून 'सभा कामकाज' या विभागावर क्लिक करावे. तेथे नियम व अटी मान्य केल्यानंतर (I Agree) संबंधित तारखेचे ठराव सर्वसामान्यांना पाहण्यासाठी व अभ्यासासाठी उपलब्ध होतील.

नगरपरिषदेने घेतलेले निर्णय, विविध विषयांवरील चर्चा आणि मंजूर झालेले ठराव आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना प्रशासकीय घडामोडींची अचूक माहिती मिळणार आहे.या सुविधेचा सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, यांनी केले आहे.

कसे पाहाल इतिवृत्त?

१. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित https://mahaulb.in या संकेतस्थळावर जा.

२. आपला जिल्हा आणि नगरपरिषद (ULB) निवडा.

३. उजवीकडील मेनूमध्ये (तीन आडव्या रेषा) 'सभा कामकाज/ठराव' विभागात जा.

४. अटी मान्य (I Agree) केल्यानंतर ६ फेब्रुवारी आणि २० एप्रिल २०२६ च्या सभांचे इतिवृत्त डाऊनलोड करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT