lightning strike death 
बीड

Beed News : परळी वैजनाथमध्ये दोन ठिकाणी वीज कोसळली; शेतकऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत बैल दगावला

शेतीपिकाचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ तालुक्यात सोमवारी (दि.३०) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान तालुक्यात वीज कोसळून दोन दुर्दैवी घटना घडल्या. सबदराबाद येथे वीज कोसळून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर कौंडगाव हुडा येथे वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सबदराबाद (ता. परळी वैजनाथ) येथील शेतकरी बालाजी बाबुराव चव्हाण (वय ३७) हे शेतात काम करत असताना जोरदार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी ते झाडाखाली थांबले असता वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कौडगाव हुडा येथील धनराज आश्रोबा फपाळ यांचा एक बैलही वीज पडून दगावल्याची घटना दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पंचनामा करून बाधित शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी सांगितले की, या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT