Parli Crime News file photo
बीड

Parli Crime News: परळीत मध्यरात्री घरफोडी; सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून ६ लाखांचा ऐवज लंपास

परळी शहरातील गणेश पार रोडवरील बाबा रामदेव मंदिरासमोरील परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

पुढारी वृत्तसेवा

Parli Crime News

परळी वैजनाथ: परळी शहरातील गणेश पार रोडवरील बाबा रामदेव मंदिरासमोरील परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सेवानिवृत्त शिक्षक दिलीप कुलकर्णी यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. कुलकर्णी कटुंबीय काही कामानिमित्त पुणे येथे गेले असल्याने घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उघडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परळी शहरात अलीकडील काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

परळीच्या शक्तीकुंज वसाहतीत आढळला तुटलेला मानवी पाय

परळी वैजनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहतीत आज सकाळी मानवी तुटलेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी ही माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरताच 'हा पाय कोणाचा?, नेमके काय घडले?' अशा चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मानवी अवयव वसाहतीत कसा आला, याचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान शक्तीकुंज वसाहतीलगत असलेल्या रेल्वे मार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वसाहतीत सापडलेला तुटलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार, रेल्वे रुळाजवळील मृतदेहाचा तुटलेला पाय भटक्या कुत्र्यांनी ओढत शक्तीकुंज वसाहतीत आणला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT