Ajit Pawar Death 
बीड

Pankaja munde ajit pawar news | अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका ; ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोक भावना

अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती! तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकिय आणि अकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त असल्याच्या भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं.. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं..असा अनुभवी नेता होणे नाही .. महाराष्ट्र एका डायनामिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजली, अशा शब्दांत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दांला जागणारे म्हणून सर्वांनाच ते परिचत होते. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही.

कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखले जाते. अशा अजित दादांच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सुसंस्कृत दादा व्यक्तिमत्व हरपले. आपल्या अभ्यासू वृत्तीने व कामाच्या झपाट्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या दादांना महाराष्ट्र विसरू शकत नाही. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवो, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी शोक व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT