Old people committed big corruption: Deputy Chief Minister Ajit Pawar
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा माजलगाव शहराचा बारामतीसारखा विकास करायचा असेल तर आम्हाला संधी द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव येथे झालेल्या जाहीर सभेत करून यापूर्वी ज्यांना तुम्ही अनेकदा संधी दिली त्यांनी मोठा भ्रष्टाचार करून नगर परिषद खून करून टाकला असा घणाघाती आरोप केला. या आरोपाला सहल चाऊस यांनी लगेच प्रत्युत्तर देत अनेकवेळा आमदारकी मिळालेल्यांनी मतदार संघ आजही भकासच ठेवला असे सांगितले.
माजलगाव मध्ये मतदानाच्या दोन दिवस आधी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराला चांगलाच उडत असून आरोप-प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. माजलगाव येथे सभेत बोलताना अजित पवार म्हणाले कि माजालागाव्च्या नाट्यगृहासाठी ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बायपासजवळ उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आम्ही सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करतो.
माजलगावमध्ये अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी नगराध्यक्षांच्या पतीने भ्रष्टाचार केला आणि तो जेलमध्ये गेला. आम्ही चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभे राहत नाही. आम्ही विकास करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभे राहतो. नगरपरिषदेसाठी नवीन उमेदवारांना संधी दिली असून जुने अनुभवी उमेदवार आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
आमदारकी घेऊन मतदारसंघ भकास : सहाल चाऊस माजलगाव : दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सहाल चाऊस यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजलगावचे आ. सोळंके यांच्यावर टीका करून माजलगावच्या विधान सभा मतदार संघात अनेकवेळा प्रतिनिधित्व मिळाले जनतेने विश्वास दाखवला परंतु आजही मतदारसंघ हा भकास असून आम्ही आमच्या कारकीर्दीत किमान शहराचे यावस्थापन चांगले करू शकलो, तुम्ही तर योजनेचा निधी सगळा गिळून घेतला. इतर मतदार संघातील विकास कामे पाहता माजलगाव मतदार संघ आजही त्याच अवस्थेत आहे, याला जबाबदार कोण असा प्रति सवाल त्यांनी केला आहे.