Beed News : कारभार सुधारण्यासाठी द्यावे लागणार इंजेक्शन File Photo
बीड

Beed District Hospital : कारभार सुधारण्यासाठी द्यावे लागणार इंजेक्शन

नूतन जिल्हा शल्यचिकित्सांनी जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

New District Surgeons need to review the functioning of the District Hospital

उदय नागरगोजे

बीड जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी, दाखल होण्यासाठी येतात. त्या तुलनेत या ठिकाणी सुविधा असल्या तरी प्रशासनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी नुतन जिल्हा शल्यचिकित्सक सतीशकुमार सोळंके यांना इंजेक्शन द्यावे लागणार आहे. ओपीडीपासून ते कार्डीयाक युनिटपर्यंतचा आढावा घेवून सुधारणा करण्याची गरज देखील व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्हा रुग्णालय हे परिसरातील रुग्णांसाठी वरदान आहे. गेवराई, बीड, शिरुर, आष्टी, पाटोदा, माजलगाव, वडवणी, धारूर या ठिकाणाहून रुग्ण जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येतात. गरजु रुग्णांसाठी या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु सर्व यंत्रणा सज्ज असतांना देखील रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याने अनेकदा नाराजी व्यक्त केली जाते. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना वारंवार यंत्रणेचा आढावा घेण्याची गरज असते.

प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत यांनी चांगल्या पद्धतीने कारभार सांभाळला होता. त्यांच्यानंतर आता डॉ. सोळंके हे रुजू होवून जेमतेम महिनाभर झालेला आहे. त्यामुळे त्यांना आता सर्व कारभाराचा आढावा घेवून आवश्यक त्या ठिकाणी इंजेक्शन अथवा छोटीशी शखक्रिया देखील करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले डॉक्टर्स, अधिकाऱ्यांना देखील मरगळ आल्यासारखे झाले असून त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करुन देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

सोनोग्राफीसाठी दोन-दोन तास थांबण्याची वेळ

बीड जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी येतात. आवश्यक त्या रुग्णांना एक्स रे, सोनोग्री करण्याची सूचना डॉक्टर करतात. परंतु सोनोग्राफीसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने रुग्णांना दोन दोन तास प्रतिक्षा करावी लागते, यात सुधारणा करण्याची गरज आहे.

दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील डॉ. सोळंके

DISTRICT HOSPITAL बीड जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. आवश्यक त्या सणांवर शस्त्रक्रिया किंवा आंतररुग्ण विभागात उपचार केले जातात. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून देखील सेवा दिली जाते, या सर्व ठिकाणचा आढावा मी घेत आहे, लवकरच आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केल्या जातील अशी माहिती डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

चार महिन्यांत झाली केवळ एक अॅन्जीओप्लास्टी

जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रतिक्षेनंतर मोठा खर्च करुन कार्डीयाक युनिट कार्यरत करण्यात आले. परंतु हे युनिट कार्यरत होवून चार महिने झाले तरी आतापर्यंत केवळ एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी गलेलठ्ठ पगार देवून डॉक्टर देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

परंतु आलेल्या रुग्णांना तपासण्यापलीकडे काही उपचार या ठिकाणी का होत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या ठिकाणी आणखी काही तंत्रज्ञांची नियुक्ती करुन आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील केल्या जातील अशी माहिती डॉ. सोळंके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT