ACB Bribe Case Pudhari
बीड

Beed news | नेकनूरमध्ये पोलीस अंमलदार लाच घेताना पकडला

बीडमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेकनुर : जिल्ह्यातील लाचखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी नेकनुर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोर आरोपीला घेऊन लागलीच एसीबीचे कर्मचारी नेकनूरमधून बाहेर पडले. बीडमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनुर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी शेतातील पवनचक्की लाईनच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका तरुणास “कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनुर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT