NEET Exam : बीड जिल्ह्यात १६ केंद्रांवर आज 'नीट' परीक्षा File Photo
बीड

NEET Exam : बीड जिल्ह्यात १६ केंद्रांवर आज 'नीट' परीक्षा

पाच हजारांवर विद्यार्थी देणार परीक्षा : तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

'NEET' Exam Held Today at 16 Centers in Beed District

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून भासत असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी व पालकांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली असताना, रविवारी दि. ३ मे २०२६ रोजी होणारी 'नीट यूजी' परीक्षा बीड जिल्ह्यातील १६ केंद्रांवर पार पडणार आहे.

या परीक्षेसाठी एकूण ५,३४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सुरक्षा तपासणीसाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेआधीच केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारी १:३० नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, तर परीक्षा सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, बीड शहरासह गेवराई येथील केंद्रांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT