संतोष देशमुख प्रकरण लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेटी घेतल्याने खळबळ उडाली आहे. Pudhari Photo
बीड

बीड | मुंडे भेटीवरून जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा काहींचा डाव

Suresh Dhas meet Dhananjay Munde | सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत

पुढारी वृत्तसेवा

बीड : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात अधिक सक्षमपनानी लढा उभा करून सर्व आरोपींना गजाआड करण्यासाठी जीवेचे रान केले कुठलीही तडजोड सुरुवाती पासून न करता एकटा देशमुख कुटुंबियाच्या मागे उभा राहिलो. मात्र आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून पोलीस आणि इतर विभागाची सखोल चौकशी पूर्ण होत असताना अशा वेळी आता मला टार्गेट करण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करत असल्याची खंत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.

राजकारणातील विरोधक असलेल्या धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली म्हणून माणुसकी या नात्याने भेटण्यास गेलो असता त्याची राळ उठविण्याचा काहीजणांनी चंगच बांधला असे दिसते. राजकीय विरोधक असले म्हणून काय माणुसकी विसरून जायची काय, विरोधक असले तरी सुख दुखात एकमेकांच्या भेटीगाठी घेणे चुकीचे कसे. आपली संस्कृती आहे. दुश्मन असला तरी त्याच्या दुखण्यात आपण जातो, मात्र मी घेतलेली भेट म्हणजे आजवर लढलेल्‍या लढ्यावर पाणी फेराण्यासारखे असाच काही जणांचा गैरसमज झाला आहे. परंतु मी माझ्या लढ्यावर ठाम आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीवर माध्यमातून चांगलेच तोंड सुख घेतले आहे. परंतु हे करत असताना जरांगे यांनी मधल्या काळात संपूर्ण समाजाचे लक्ष आणि विश्वास धस यांच्या पाठी मागे उभा राहत असल्याचे लक्षात येताच मिळालेली संधी ही उत्तम असून याचा फायदा उचलत धस यांच्यावर थेट चिखल फेक सुरु केली आहे. या चिखलफेक बाबत आमदार धस यांनी मात्र बोलण्याचे टाळून जरांगे आमचे दैवत आहे अशी प्रतिक्रियाच दिली. एकूणच प्रेमाच्या दिवशी अर्थात व्हॅलेंटाईन डे या दिवशी सुरु झालेली धस-मुंडे भेट आता मात्र तो मी नव्हेच इथ पर्यंत आली असून मनोज जरांगे यांच्या चिखलफेकी मुळे मात्र आता सैराट झाल जी म्हणण्या पर्यंत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT