Kej taluka minor girl case
केज : केज तालुक्यात एका तेरा वर्षाच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा शेतात कोणी नसताना एका २० वर्ष वयाच्या तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि. २१) दुपारी एक तेरा वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेला सुट्टी असल्याने तिच्या शेतात गेली होती. त्याच वेळी त्यांच्या शेजारी शेत असलेल्या बालाजी भांगे या तरुणाने तिच्या हाताला धरुन तिचा विनयभंग केला. जर हा प्रकार कुणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून बालाजी दिलीप भांगे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके पुढील तपास करीत आहेत.