Married woman molested, accused beaten by relatives
केज पुढारी वृत्तसेवा :
महिलेचा पती बाहेरगावी असल्याचा गैरफायदा घेऊन रात्री घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला असून त्याच्या विरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्या ग्रामपंचायत सदस्याला ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा पती हा मागील काही दिवसांपासून मजुरीसाठी बाहेरगावी गेले आहे. ११ जून रोजी ती महिला तिच्या मुलाला घेऊन घरात झोपली होती. त्यावेळी रात्री बालू बिभीषण चिंचकर हा त्या ठिकाणी आला व त्याने विनयभंग केला.
त्या महिलेने आरडाओरड केल्या नंतर तिचे नातेवाईक जमा झाले आणि त्याला चांगलाच बदडून काढला. दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून त्या नराधमा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.