हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान देणारे दुर्लक्षित गाव टाकळगाव file photo
बीड

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन : हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान देणारे दुर्लक्षित गाव टाकळगाव

पुढारी वृत्तसेवा

बीड, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची बीज पेरल्या गेली ती मराठवाडयाच्या मातीत, बीड जिल्ह्यात अनेक विकाणी उठाव झाले, या उठावाला अनेक गावांनी सहकार्य करत आंदोलनाचे केंद्रस्थान बनवले, त्यातीलच एक गाव म्हणजे गेवराई तालुक्यातील टाकळगाव. या गावातील ओक धाडसी क्रांतिकारकांनी जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन, सीमेवरील सशश्त्र कैम्प याच्यामध्ये मोटा सहभाग घेऊन आपले बलिदान दिले होते. मुक्तिसंग्राम लढ्यात एवढे मोठे योगदान देणारे टाकळगान आज दुर्लक्षित आहे, याबाबत इतिहासकार तथा प्रसिध्द नारधलेखक, अभीनेते डॉ. सतीश साळुंके यांनी खेद व्यक्त केला.

गाणे रावजी नारायण, श्रीरंग गहाणे, काशिनाथ गव्हाणे, रानवा गव्हाणे, एकनाथ डगे, विठ्ठलराव काटकर, शेषराम गव्हाणे यासारख्या धाडसी क्रांतिकारकांची जन्मभूमी टाकळगाव हे आडवाटेला आहे. यामुळे या गावचा इतिहास सर्वदा पोहोचू शकला नाही. १९३८ च्या सत्याग्रहात टाकळगव्हाण गावातील अनेक क्रांतिकारकांनी सहभाग घेतला होता. ते निजामाला उत्तर देण्यासाठी रस्त्यांवर उतरले होते.

गेवराई येथे महाराष्ट्र परिषदेचे भव्य अधिवेशन भरविले. याप्रसंगी टाकळगावच्या क्रांतिवीरानी अधिवेशनात सहभागी होण्यासाती भव्य लाँग मार्च काढला होता. या लाँग मार्चवर अरब रजत्कारांनी हालवारीने हल्ला केला, हा हल्ला टाकळगावचे धाडसी तरुण काशिनाथ नारायण गव्हाणे यांनी प्रतिकार करत मोडीत काढला, त्याचे धाडस पाहून इतरांनीही विरोध केला. हा विरोध पाहून अरब रजाकार पाहून गेले. परंतु काशिनाथ कहाणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांचे स्मारक टाकळगव्हाण या गावी उभारण्यात आले आहे.

झेंडा सत्याग्रहातही टाकळगावने सहभाग नोंदवला होता. माण्णून त्या गायला सहा हजार रुपये दंड बसविला. ही दंडाची रक्कम वसुलण्यासाठी पोलिसांनी गावयायांची घरे लुटली जंगल सत्याग्रहानही टाकळगव्याणच्या क्रांतिकारकांनी सहभाग नोंदवला. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या सशस्त्र उठावात टाकळगव्हाणच्या तरुण स्वातंत्र्यसैनिकांनी पाडळशिंगोचे पोस्ट ऑफिस चॉम्बने उडवले तर चकतंना पोलिस चौकी हॅन्ड ग्रेनेडने उडवली होती.

अशा या बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे गान असलेल्या टाकळगावचे आस्तित्व इतिहासाच्या नकाशावर सापडत नाही. कारण या गावाला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाही. हिरापूरमधून रस्त्यापासून टाकळगावला जावे लागते. जूना जो रस्ता होता तो आज जाणिवपूर्वक वापरला जात नाही. हाच जुना सता हिरापूर वळण रस्त्यापासून सोलापूर संभाजीनगर हायवेला जोडल्यास इतिहास अभ्यासकांना टिकव्ळगात्री जाणे सोपे होईल, यातून गावचा इतिशात देशपातळीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रसिध्द इतिहासकार डॉ. सतीश साळुंके म्हणाले.

प्रवेशव्दार कमानीला हवे काशिनाथराव यांचे नाव

जुना व नवा रस्ता ज्याठिकाणी एकमेकांना मिळवतात तेथून पूर्व दिशेला ओकधाच्या बाजूने पक्का डांबरी रस्ता बनवणे गरजेचे आहे. तसेच रस्ता बनवून अन् सुशोभिकरण करून भव्य प्रवेशद्वार कमान करून त्याला स्वातंत्र्यसैनिक काशिनाथरान गदाणे यांचे नाव द्यावे, अशी मागणी बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, मराठावटा मुतिसंग्रामातील गव्हाणे रावजी नारायण, श्रीरंग गहाणे, काशिनाथ गव्हाणे, रानवा गब्यणे, एकनाथ डगे, विठ्ठलरात्र काटकर, शेषरान गव्हाणे हे प्रमुख क्रांतिकारक, टाकळगालचे होते. त्यांचा सल्यान सायलाच हवा, असे प्रसिध्द इतिहासकार डॉ. सतीश साळुंके म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT