Graduate voters registration 
बीड

Graduate voters registration: आता पदवीधर मतदार नोंदणीची लगबग सुरू...

Beed latest news: आतापर्यंत शेकडो पदवीधरांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले असून, अंतिम मतदार यादी येत्या काही आठवड्यांत प्रसिद्ध होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

सुभाष मुळे

गेवराई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनासह निवडणूक विभागाकडून यासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून, पदवीधर नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पदवीधर पात्रता दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची असावी, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अर्जदाराने आपल्या पदवी प्रमाणपत्राची छायाप्रत, राहण्याचा पुरावा, व आधारकार्ड किंवा ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीसाठी ठराविक अर्ज नमुना (फॉर्म-१८) उपलब्ध करून देण्यात आला असून तो ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी सादर करता येतो.

शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालये, विद्यापीठे, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी व पदवीधरांमध्ये जनजागृती अभियान राबवले जात आहे. यामध्ये प्रबोधन मोहीम, मार्गदर्शन शिबिरे व माहितीपत्रकांचे वितरण यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शेकडो पदवीधरांनी नोंदणीसाठी अर्ज सादर केले असून, अंतिम मतदार यादी येत्या काही आठवड्यांत प्रसिद्ध होणार आहे.

नोंदणीची अंतिम तारीख लवकरच जाहीर होणार असली तरी, पात्र असलेल्या प्रत्येक पदवीधराने वेळेत आपले अर्ज दाखल करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. मतदार संघातील आगामी निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे उत्साही वातावरणाची चिन्हे दिसू लागली असून, नवीन मतदारांच्या नोंदणीमुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT