मरळवाडी सरपंचाची गोळी झाडून हत्या  Pudhari Photo
बीड

परळी हादरली : सरपंचाची अज्ञाताकडून गोळी झाडून हत्या

पुढारी वृत्तसेवा

परळी, पुढारी वृत्तसेवा: परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाल्याची घटना शनिवारी (दि.29) घडली. या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले. तर ग्यानबा गीते जखमी झाले आहेत. हा गोळीबार राजकीय वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जखमी असलेल्या गीते यांच्यावर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तसेच हा गोळीबार कोणी केला? आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान परळीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT