Manoj Jarange: Make Dhananjay Munde a co-accused
केज, पुढारी वृत्तसेवा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः तुमच्यासोबत मुंबईला येण्यास तयार आहे. मात्र, जोपर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे यांना या गुन्ह्यात सहआरोपी केले जात नाही, तोपर्यंत हा समाज मागे हटणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात जरांगे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
जरांगे म्हणाले की, हत्येला एक वर्ष उलटूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. मुख्य आरोपी अजूनही फरार असून देशमुख कुटुंब भयाखाली जगत आहे. सरकार मारेकऱ्यांना पाठीशी मालात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अजून समाजातील किती मुलांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार? असा संतात सवाल त्यांनी केला. न्याय मिळवण्यासाठी आपण आ. सुरेश धरा, खा, बजरंग सोनवणे, आ. क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस बंच्याकडे जाऊ, असेही त्यांनी सांगितले. अजित पवारांवर निशाणा संबंधित नेत्याचे कॉल रेकॉर्ड आहेत, मग त्याना सहआरोपी का कले नाही?
अजित पवार यांच्या आश्रयामुळेच आरोपींना संरक्षण मिळत आहे. अशा क्रूर भारेकऱ्यांना अजित पवार सांभाळतात, त्यांच्या पक्षात दूसरे ओबीसी नेते नाहीत का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला ज्यांनी आमच्या लेकरांचा खून केला, त्यांना वाचवणे म्हणजे तुम्हीही खुनी आहात तुम्हाला माप मिळणार नही, असेही त्यांनी सुनावले.
शांततेसा उद्रेक होऊ देऊ नका! महाराष्ट्रातील पोरं तापलेली आहेत, मराठ्यांमध्ये मोटी आग आहे, शांततेचा उद्रेक झाला तर सरकारला ते आवरणार नाही. कोणाचे धमकीचे फोन येत असतील हा आम्हाला सांगा, चार-दोन जणांना फरकवल्याशिवाय काही जमणार नाही. असा सम्बंड दमय कराने यांनी भरला. आम्हाला न्याय कधी मिळणार? वैभवीचा सवाल वडिलांच्या हत्येला एक मर्ष झाले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. मुख्य आरोपी सापडत नसल्याने आमचे कुटुंब भीतीच्या छायेत आहे, अशी व्यथा मांडत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने घंट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्हाला न्हाय कधी मिळणार? अला काळजाला हात घालणारा सवाल विचारला.
अजित पवार व धनंजय देशमुखांत 'कानगोष्टी'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी मयत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी यांच्याशी चर्चा केली. न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सविस्तर चर्चेसाठी धनंजय देशमुख यांना मुंबई किंवा नागपूरला बोलावले. दरम्यान, अजित पवार आणि धनंजय देशमुख यांच्यात झालेल्या मकानगोष्टीफ्ची परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.