प्रातिनिधिक छायाचित्र  (File Photo)
बीड

Beed Crime News : आमच्या नाजूक संबंधाआड येऊ नको म्हणत फोटो ग्राफरचे डोके फोडले

तू भाकर तुकड्याचे बघ असे म्हणून फोटोग्राफर गोरखला विकासने केली मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Man Brutally Beaten by Two Individuals in Beed

गौतम बचुटे /केज :- आमच्या मॅडमच्या नाजूक आणि कोमल संबंधाच्या आड येऊ नको तू तुझ्या भाकर तुकड्याचे बघ असे म्हणून एका फोटोग्राफरला एक इसम आणि त्याचा साथीदाराने मारहाण करून डोके फोडले.

दि. २१ एप्रिल रोजी केज तालुक्यातील पाथरा येथील फोटोग्राफर गोरख बालासाहेब पवार हे रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील फोटो स्टुडिओ बंद करून ते त्यांच्या पाथरा या गावी जात असताना त्यांना कळंब अंबाजोगाई रोडवरील पद्मावती मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पुलाजवळ लघुशंकेस थांबले असताना विकास लक्ष्मण खाडे (रा. आथर्डी ता. कळंब, ह. मु. संभाजीनगर, कळंब) व त्याच्या सोबतच्या एका साथीदारांनी अडविले.

यावेळी त्‍या दोघांनी गोरख पवार यांना दमदाटी करायला सुरूवात केली. यावेळी ते म्हणाले की, "तू, तुझ्या भाकर तुकडा खायचे बघ, तू मॅडम आणि आमच्यामध्ये असलेल्या कोमल व नाजूक संबंधामध्ये येऊ नको." असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विकास खाडे याने फोटो ग्राफर गोरख पवार यांच्या डोक्यात दगड मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

गोरख पवार यांनी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विकास खाडे व त्याच्या अनोळखी मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुरेश गित्ते हे अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT