माजलगाव : शहरातील एका वकिलाने मोबाईलवरून फोन करून महिलेशी अश्लील व लज्जास्पद संभाषण करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील वकील सुधीर लिंबगावकर याने आपल्या मोबाईल नंबरवरून फिर्यादी महिलेला फोन करून वेळ आहे का तुला? असे विचारले. त्यावर फिर्यादी महिलेने 'काय काम आहे?' असे विचारले असता आरोपीने अश्लील बोलणे सुरू केले. त्याने महिलेशी लज्जास्पद व अशोभनीय भाषेत संभाषण केले. या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक धक्का बसला असून आपल्या सन्मानाला ठेच लागल्याची भावना तिने व्यक्त केली. या घटनेनंतर संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयिताविरूद्धात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.