गेवराई : मागील एक वर्षापासून काम करत असताना प्रचंड त्रास झालेला आहे. म्हणूनच आमदारकी लढविणार नाही असा निर्णय घेतला असूर, कदाचित तुम्हाला विचारात घेऊन हा निर्णय घेतला असता तर ती घेता आला नसता. तरीही निर्णय तर झाला एक ऑक्टोबरला भूमिका स्पष्ट करेल. असे सांगून पालकमंत्री धनंजय मुंडे है प्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहेत. शिवाय बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्याचे वाटोळं केले असून, त्यांना तर नाहीच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आमदारकीचा गुलाल लागू देणार नाही, असे आवाहन बीडमधील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करताना केले.
बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपाचे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, शिवाय माझ्या कुटुंबीयातील कोणताच सदस्य ही निवडणूक रिंगणात दिसणार नाही, असा निर्णय घेतल्याने बुधवारी आमदार पवार यांच्या निवासस्थाना समोरील संपर्क कार्यालयात कार्यकत्यांनी ठिय्या मांडला होता. कार्यकत्यांच्या संतप्त भावना पाहून आमदार लक्ष्मण पवार यांनी मागील एक वर्षांपासून काम करत असताना प्रचंड त्रास होत आलेला आहे. पालकमंत्री यांनी विविध समित्या बरखास्त करून एक प्रकारे विकास कामात अडथळा आणून त्यांच्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
आमदार महणून लोकांच्या कामाला येत नसेल तर त्या पदाचा उमयोग काय? अशी भावना व्यक्त करून गेवराई तालुक्याचे वाटोळं करणाऱ्या बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांचा तर नाहीच, शिवाय त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला देखील आमदारकीला निवडून येऊ देणार नाही.
पवार कार्यकत्यांकडून फेरविचार करण्याची मागणी केली असतानाच निर्णय तर झालेला आहे, तरीही एक ऑक्टोबरला भूमिका स्पष्ट करेल असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.