आष्टी : कोल्हेवाडी येथील पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर निम्म्या रात्री सापळा रचून शनिवारी (दि.३०) कारवाई केली. यावेळी १५ जणांना ताब्यात घेऊन अंभोरा पोलिसांनी ५ लाख ६४ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हेवाडी येथे पत्त्यांचा डाव मांडला असल्याची गुप्त माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोल्हेवाडी येथील पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर निम्म्या रात्री सापळा रचून कारवाई करण्यात आली. संशयितांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहे.