अपहरणाचा बनाव रचणाऱ्या आरोपींना पोलिस पथकाने ताब्‍यात घेतले.  Pudhari Photo
बीड

केज तालुक्यात अपहरणाचा बनाव : पोलिसांची रात्रभर धावाधाव अन् पळापळ

Beed Crime News | तरुणांची धाब्‍यावर आपसांत हाणामारी अन पोलिसांत केला अपहरणाचा कांगावा !

पुढारी वृत्तसेवा

केज :- पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून एकाचे अपहरण केल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली. मिळालेली माहिती गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती दिली आणि गुन्हा दाखल करून घेत आरोपींना शोधण्यासाठी रात्रभर वेगवेगळे पथके तयार करून शोध घेतला परंतू या घटनेची संदर्भातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेताच सत्य उलगडले आणि दोन गटात एकमेकांशी एका धाब्यावर भांडण झाले आणि त्यातून त्यांनी अशी खोटी फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाले.

याबाबतची माहिती अशी की केज तालुक्यातीलअंकुश श्रीहरी ढाकणे याने केज पोलीस ठाण्यात दिनांक ३ जानेवारी रोजी मध्यरात्री २ च्या वाजण्याच्या सुमारास अशी माहिती दिली की, जुन्या भांडणाच्या कारणावरून दहिफळ वडमाऊली तालुका केज येथी तरुण विशाल गदळे यास जोला गावातील काही तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून उचलून त्याचे अपहरण केले आहे. अशी माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि ल पोलीस उपाधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि पोलीस कर्मचारी यांनी पोलिसांची दोन पथके रवाना केली. पोलीसांनी रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींची शोध मोहीम चालू केली.

दरम्यान फिर्यादी अंकुश श्रीहरी ढाकणे राहणार बरड फाटा केज यांची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे यांनी घेतली. व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. फिर्यादीने सांगितलेली घटना ही अत्यंत गंभीर असल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते. पोलीस पथके रात्रभर जागून तपास करीत होते.

दरम्यान शोध घेत असताना पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या सोबत असलेल्या पथकाला नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाणगाव फाट्या जवळील सह्याद्री ढाब्याच्या पाठी मागचे बाजूला एक काळी स्कार्पिओ व त्यातील लोक वाहनाच्या मागील बाजूस तात्पुरत्या शेड मध्ये असल्याचे दिसून आले. पोलीसांनी त्या सर्वांवर ते गाफील असताना अचानक छापा टाकला आणि सर्व आठ आरोपी व गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ ताब्यात घेतली.

खरे कारण कळताच पोलिसही चक्रावले

पोलीस ठाण्यात सर्व आरोपी पकडून आणल्याचा आनंद पोलिसांना झाला. मात्र पकडलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता धाब्यावर दारू पिवून त्यांनी आपसांत भांडण करुन एकमेकांना लाट्या काट्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली होती. पिस्तुलाचा धाक दाखवून ज्या विशाल गदळे याचे अपहरण झाल्याचा त्यांनी बनाव केला. ते सर्व खोटे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

कठोर कारवाई केली जाईल

या प्रकारावरून पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे अँक्शन मोडवर आले असून त्यांनी असे आवाहन केले आहे की, अशा प्रकारे पोलिसांना कोणी खोटी माहिती देवून फसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल यात कुणाचीही गय केली जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT