केज : विधान सभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या सीमा सुरक्षा जवाना सोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत महाजन व पोलिसांनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवाना सोबत दिवाळी साजरी केली.
या बाबतची माहिती अशी की केज राखीव मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सीमा सुरक्षा जवानांची एक कंपनी केज आहे ते मागील आठ दिवसा पासून तळ ठोकून आहे. दरम्यान देशसेवा बजावणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकारी हे त्यांच्या कुटुंबा पासून घरा पासून दूर असतात. त्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कंपनीचे अधिकारी परसराम सिंग आणि यादव यांची चर्चा करून त्या सर्वा सोबत एकत्र जेवण करून दिवाळीचा फराळ केला. तसेच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. एक वेगळ्या पद्धतीने आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सोबत दिवाळी साजरा करण्याचा केज पोलिसांना योग आला.
डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेवर व दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या या सीमा सुरक्षा दलाचे आणि भारतीय सैन्य दलाचे कार्य खडतर आणि अवघड आहे. त्यांच्या सेवेचा प्रत्येक देशवासीयांना अभिमान आहे.कमलेश मीना, सहाय्यक पोलीस अधिक्षक,
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सोबत दिवाळी साजरी करताना आमचा उर देश प्रेमाने भरून आला.- प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, केज