Crime Pudhari
बीड

Kej Crime | केज येथील कत्तलखान्यावर पोलिसांची धाड, कत्तल केलेले गोवंशीय प्राण्यांचे मांस ताब्यात

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 30 गोवंशीय प्राण्यांची केली सुटका

पुढारी वृत्तसेवा

केज :- केज पोलिसांनी केज शहरात सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर धाड टाकून गोवंशीय प्राण्यांचे मांस आणि कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ३० गोवंशीय प्राण्याचा ५ लाख.६८ हजार रु.चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दि. १४ मे रोजी रात्री ११:३० रात्र गस्त घालीत असलेले पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शेषेराव रोडे आणि चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांना माहिती मिळाली की, केज शहरातील अल्लाउद्दीन नगर जवळ असलेल्या रोड लगतच्या पत्रच्याशेड जवळच्या नाल्या जवळील जागेत दोन इसम गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करीत आहेत. अशी माहिती मिळताच त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप मांजरमे यांना दिली.

त्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फुलचंद सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने. पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस कॉन्स्टेबल संतोष गित्ते, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे यांच्या यांच्या पथकाने पशु वैद्यकीय अधिकारी व दोन सरकारी पंच यांचे समक्ष केज शहरातील अल्लाउद्दीन नगर येथील कत्तल खाण्यावर दि. १५ मे रोजी मध्यरात्री २:१५ वा. च्या सुमारास छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी जफर गफार खुरेशी, वय (४० वर्षे) आणि आयान सलीम खुरेशी, वय (१९ वर्षे), दोन्ही (रा. रोजा मोहल्ला केज) हे दोघे त्यांचे हातामध्ये लोखंडी चाकु, कुऱ्हाड घेवुन गोवंश जातीचे जनावराची कत्तल करीत असताना मिळुन आले.

त्यांच्याकडे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तल करण्या बाबतचा कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडे त्यांनी कत्तल केलेल्या गोवंशीय प्राण्यांचे मांस व अवयव आढळून आले. तसेच त्यांनी कत्तल करण्यासाठी दावणीला डांबून ठेवलेले ३० जनावरांची सुटका करण्यात आली. या कत्तलखान्यव टाकलेल्या धाडीत पोलिसांनी गोमांस, ३० गोवंशीय प्राणी, एक स्कुटी आणि इतर साहित्य असे एकूण ५ लाख ६८ हजार रु. चे मुद्देमाल ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांच्या फिर्यादी वरून जफर गफार खुरेशी आणि आयान सलीम खुरेशी यांच्या विरुद्ध गु. र. नं. २९२/२०२६ भा. न्या. सं ३२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमचे कलम ११, महाराष्ट्र पशु संरक्षण अधियमचे कलम ५ सी, ९ ए, महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ११८, ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे हे पुढील तपास करीत आहेत.

शहरात असे अनेक कत्तलखाने असून गोवंशीय प्राण्यांची मांसविक्री शहरात सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान - पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT