Murder Case Pudhari
बीड

केज तालुक्यातील सुर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये खून

या खून प्रकरणी पोलिसांनी मारेकरी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : तालुक्यात शिर्डी फाटा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एका टिप्पर चालकाला काठीने केलेल्या बेदम मारहाणीत एका जागीच मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी मारेकरी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीतील सुर्डी येथील खाजगी वाहनावर तिप्पर चालक म्हणून काम करीत असलेले खुशालराम बलभीम ठोंबरे वय (५५ वर्ष) याचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या मंगेश भरत माने वय (४५वर्ष) याच्या कुटुंबा सोबत (दि. ४) मे रोजी रात्री भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून (दि.५) मे रोजी दुपारी २:०० वाजता ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या मंगेश भरत माने याने खुशालराम बलभीम ठोंबरे हे केज-कळंब रोडवर असलेल्या सुर्डी फाट्यावर असलेल्या राहुल शेलार यांच्या वडापाव विक्रीच्या टपरीवजा असलेल्या हॉटेलमध्ये बसलेले असताना रात्रीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या खुशालराम ठोंबरे यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

मयत टिप्पर चालक खुशालराम बलभीम ठोंबरे यांचा मुलगा बालाजी खुशालराम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश भरत माने याच्या विरुद्ध (दि.५ मे) रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास गु. र. नं. १२४/२०२६ भा. न्या. सं. १०३(१) नुसार युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी भरत माने याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयत टिपर चालक खुशालराम बलभीम ठोंबरे यांच्यावर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT