केज :दळण घेऊन पायी चाललेल्या महिलेची गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झटापट करीत ओढून घेतली. त्या दोघांनी दुचाकीवरून धूम ठोकली. ही घटना केज शहरात १३ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली.
धनेगाव (ता. केज) येथील सीमा उत्तमराव गायकवाड या नोकरीस असून त्या मुलासह केज शहरातील समता नगर भागात वास्तव्यास आहेत. १३ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास आहिल्यानगर येथून दळण घेऊन पायी घराकडे जात होत्या. तोळाबाई गाढवे यांच्या अंगणवाडी समोर उमरी रोडने आल्या असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून अनोळखी २० ते २२ वर्ष वयाचे दोन तरुण आले. त्यांनी झटापट करीत त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोन्याची चैन ओढून घेऊन त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. सीमा गायकवाड यांच्या तक्रारीवरून त्या अनोळखी दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार बाळासाहेब रोडे हे पुढील तपास करीत आहेत.
लोकांनी पाठलाग केला, मात्र हाती लागले नाहीत
दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी समोरील मुलाच्या अंगावर पांढरा शर्ट व पाठीमागील मुलाचे आंगावर पांढरी व काळी डिजाईन असलेले फुल भायाचे शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट होती. सोन्याची चैन घेऊन जाताना लोकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र दुचाकीने ते भरधाव वेगाने निघून गेल्याने हाती लागले नाहीत. तर त्यांचा दुचाकीवरून भरधाव जाताना पाठीमागून त्यांचा व्हिडीओ काढला आहे.