केज :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत धाडसी कारवाई करून ७ लाख ३६ हजार रु. ची बनावट दारू जप्त केली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनातून बनावट दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
दिनांक २१ जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक चौरे यांच्या पथकातील कुबडे, कोरे, कदम, जारवाल, एस.व्ही. लोमटे, वायबट, कदम, श्रीमती ढवळे, पोतलवाड, चाटे यांनी कारवाई करून बनावट दारू वाहतूक करीत असताना युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीत रेवण सोपान नखाते वय (३५ वर्ष), (रा. मठगल्ली, धारूर), गणेश मारोती धुमाळ वय (३५ वर्ष), (रा. उपळाई रोड, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर) आणि पप्पू कदम हे स्विफ्ट गाडी क्र. (एम एच १४/ इ पी ३७४१) मधून बनावट दारूची वाहतूक करीत असताना आढळून आले.
मोठी व धाडसी कारवाई केली आहे.दि. २१ जानेवारी रोजी कळंब–अंबाजोगाई रोडवरील युसुफवडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. केज परिसरात बनवत दारूची वाहतूक करत असताना ता. केज तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड व अंबाजोगाई यानी भरारी पथकाने मोठ्या प्रमाणात बनावट दारू व इतर मुद्देमाल जप्त केला. त्यात १ लाख ३२हजार रु. ची रॉयल स्टॅग, ८४ हजाराची टँगो पंच, १ लाख ४० हजाराचे तीन मोबाईल आणि स्विफ्ट गाडी तिची किंमत ३, लाख ८० हजार असा एकूण ७ लाख ३६ हजार रु मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत रेवण सोपान नखाते, गणेश मारोती धुमाळ या दोघांना ताब्यात.घेतले आणि पप्पू कदम हा पळून गेला.
आणखी एक आरोपी या गुन्ह्यात असल्याची चर्चा :
या बनावट चोरट्या दारू वाहतूक प्रकरणात आणखी एक व्हाइट कॉलर आरोपी असल्याची चर्चा तालुक्यात आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबत मौन पाळले आहे.