केज :- केज शहरातून विनापरवाना दुचाकी रॅली काढून दहशत निर्माण करीत व्यावसायिक व दुकानदारांना सक्तीने त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या ४० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील धीरज परदेशी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ तरुणांनी केज शहरातील वकीलवाडी भागातून बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०५ ते ११.३० वा. च्या दरम्यान तरुणांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढून तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात नेली. ही रॅली विनापरवाना काढीत रॅलीतील तरुणांनी रस्त्यावर दहशत करून व्यावसायिक व दुकानदारांना दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यासाठी भाग पाडले.
तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ अन्वये दिलेल्या नोटीशीचे उल्लंघन केले. तसेच जिल्हाधीकाऱ्यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी दिलेल्या अशा आशयाच्या तक्रारी वरून अजय अशोक तांदळे (रा. कोरेगांव), महादेव गंगाधर मोरे (रा. धारुर रोड, भवानीनगर केज), सदाशिव नामदेव आंधळे (रा. आंधळेवाडी), धरमसिंग दिलदारसिंग गोके, अमोल सुरवसे, सोनल देवकर, करण प्रमोद राऊत, दिनकर नेहरकर, संग्राम चाटे, मयुर गुंड, बळीराम नेहरकर, पवन अंधारे या १२ जणांसह दुचाकी क्र. (एम एच २४/ सी ९३६६) वरील इसम व इतर १५ ते २० लोकां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५१८/२०२६, भा. न्या. सं. ३५१(२),३२३ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार संगीता हनवते या पुढील तपास करीत आहेत.