बीड

Kej Accident | केज येथे दोन कार आणि एसटी बसचा तिहेरी अपघात!

दोन कारला एसटी बसची मागून धडक, तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

केज :- समोरील कार ही विरुद्ध दिशेला असलेल्या पेट्रोल पंपाकडे वळत असल्याने तिच्या मागून येणाऱ्या दोन कारचा वेग अचानक कमी झाला, त्‍याचावेळी पाठीमागून आलेल्या एसटी बसने दोन्ही कारना जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत तर तिन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. पेट्रोल पंपाकडे वळणार कारचालक मात्र कारसह घटनास्थळावरुन पसार झाला.

दि. ५ मार्च रोजी दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या पिसेगाव फाट्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात झाला. अंबाजोगाई कडून येणारी एक कार ही उजव्या बाजूला वळत असल्याने त्याच रस्त्याने पाठी मागून केजकडे येणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी रिट्झ दोन कार क्र. (एम एच१२/जी आर ९०२२) आणि क्र. (एम एच०६/बी एम१६८२) यांनी त्यांचा वेग कमी करताच पाठी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील अंबाजोगाई आगाराच्या अंबाजोगाई-संभाजीनगर एस टी बस क्र. (एम व ०९/एफ एल १०२१) ने त्या दोन्ही कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

यात दत्ता लांडगे चालवित असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट ही गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन चेंदामेंदा झाली आहे. मात्र गाडीचे एवढे मोठे नुकसान होऊन देखील चालक दत्ता लांडगे (रा. केज जि. बीड ) यांना मुका मार लागून ते जखमी झाले आहेत. तर मारुती सुझुकी रिट्झ गाडीचा चालक विनोद जगताप (रा. कळंब जि. धाराशिव) आणि एसटी चालक मारुती फड (रा. पट्टीवडगाव ता. परळी) यांना मुका मार लागून जखमी झाले आहेत.

दैव बलवत्तर म्हणून मोठी नाही टळली !

अंबाजोगाई - संभाजी नगर या बसने एकूण १७ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती वाहक बालासाहेब नागिशे यांनी माहिती दिली. तसेच रिट्झ कारमधून एका महिलेला प्रसुतीसाठी सोडून परत येत असताना अपघात झाला. तर स्विफ्ट कार मध्ये दत्ता लांडगे ही एकटेच होते.

अपघातातील जखमी

या तिहेरी अपघातात दत्ता लांडगे (रा. केज जि. बीड ), विनोद जगताप (रा. कळंब जि. धाराशिव) आणि एसटी चालक मारुती फड (रा. पट्टीवडगाव ता. परळी) या तिघांना मुका मार लागून ते जखमी झाले आहेत. हे तिघेही वाहन चालक आहेत.

तिन्ही वाहने एकाच दिशेला जात होती :

- केज येथे झालेल्या तिहेरी अपघातात चारही वाहने एकाच दिशेने जात होती. पेट्रोल पंपाच्या दिशेने वळत असलेल्या कारमुळे या तिन्ही वाहनांचा अपघात झाला. तीन वाहनांचा अपघात होताच पेट्रोल पंपाकडे वळत असलेला कार चालक मात्र अपघात घडताच त्याच्या कारसह फरार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT