Girl Missing Case Pudhari
बीड

Beed Crime News | केज शहरातून दोन महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणी बेपत्ता झाल्या असल्याने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : मागील दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनेत केज शहरातील दोन महाविद्यालयीन युवती बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील नामेवाडी येथील जयश्री मधुकर केदार वय (२२ वर्ष) ही शहरातील जीवन शिक्षण कॉलेजमध्ये बी एस्सी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ती आपल्या वडिलांसोबत ४ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. कॉलेजमध्ये परीक्षा फी भरण्यासाठी आले होते. फी भरल्यानंतर ते दोघे पोर्चमध्ये कठड्यावर सावलीला बसले होते.

दुपारी २:०० वा. जयश्री केदार ही तरुणी वडिलांना न सांगता त्यांची नजर चुकवून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेतला असता तिचा तपास लागला नाही. तिचा रंग गोरा असून उंची ५ फुट आहे. तिच्या अंगावर लाल रंगाचा टिपके असलेला पंजाबी ड्रेस व पांढरी लेगीज पॅन्ट आणि पायात सँडल आहे. तिच्या वडिलांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत काळेगाव (घाट) ता. केज येथील योगेश्वरी नंदकिशोर कोठावळे वय (१८ वर्षे) ही शहरातील भाऊसाहेब पाटील अध्यापक शिक्षण घेत आहे. दि. २ मार्च रोजी दुपारी २.३० वा. ती विद्यालयातून कोणालाही न सांगता निघून गेली. तिचा तपास लागला नाही. तिचा रंग गोरा असून चेहरा गोल आहे. तिची उंची साडेचार फुट असून अंगात पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. तिच्या वडिलांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसात शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणी बेपत्ता झाल्या असल्याने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT