Beed News : खोटी तक्रार देणे पडले महागात; केज पोलिसांनी केला गुन्हा दाखल File Photo
बीड

Beed News : खोटी तक्रार देणे पडले महागात; केज पोलिसांनी केला गुन्हा दाखल

तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या युवकाच्या बोलण्यात तफावत आढळून आल्याने तक्रार देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kage police registered a case for filing a fake complaint

केज, पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्याची ऊस तोडणीसाठी उचल घेऊन गावाकडे जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून रस्त्यात अडवून मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील पावणे दोन लाख रु. घेऊन पळून गेले. अशी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या युवकाच्या बोलण्यात तफावत आढळून आल्याने पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी बनावट तक्रार देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील तरनळी येथील अंगद अनंत खेडकर हा दिनांक १३ जून रोजी रात्री १०:३० वाजता केज पोलिस ठाण्यात आला. त्याने पोलिसांना सांगितले की तो. दि. १३ जुलै रोजी ऊसतोड मुकदमाकडून १ लाख ७५ रुपयांची उचल घेऊन तो मोटारसायकलीवरून कानडी माळी मार्गे तरनळी या त्याच्या गावाकडे जात असताना रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी गावाजवळ त्याचा मोटार सायकली वरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करून त्याला गावापासून दीड किमी अंतरावर निर्जनस्थळी अंधारात अडविले. त्याला दगडाने मारहाण केली आणि शस्त्राने जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पँटच्या खिशातील १ लाख ७५ हजार रु., मोबाईल आणि मोटार सायकलची चावी घेऊन पळून गेले. अशी माहिती अंगद याने पोलिस ठाण्यात दिली.

मात्र चाणाक्ष असलेल्या पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी एवढे पैसे पॅन्टच्या खिशात कसे मावले? तसेच एवढी रक्कम घेऊन तो एकटाच आणि एवढ्या रात्री आडमागनि का जात असावा ? याबाबत शंका आली.

तसेच एवढ्या रकमेच्या नोटा किती होत्या ? हे त्याला सांगता येईनासे झाले. त्याच बरोबर पोलिस निरीक्षक उनवणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने यांनी तपास करून सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी अंगद खेडकर यांच्याशी कोणी कोणी संवाद साधला. या बाबत गुप्त माहिती घेतली. त्या नंतर पोलिसांची खात्री पटली की, तक्रारदार याचे पैसे चोरीला गेले नसून हा बनाव आहे.

हे निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने महिला पोलिस जमादार निर्मला जाधव यांच्या तक्रारीवरून खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंगद खेडकर याची विरुद्ध अदखलपात्र गु. र. नं. ७४६/२०२५ भा. न्या. सं. २१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकोस्टेबल त्रिंबक सोपने हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT