सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. File Photo
बीड

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती स्थापन

Santosh Deshmukh Murder Case| सहा महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार असून समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT