बीड

अवघ्या काही दिवसांवर विवाह ! बंधनात अडकण्यापूर्वीच रेल्वे पोलीस जवानाने जीवन संपवलं

Beed news | काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका तरुण रेल्वे पोलीस जवानाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दिनांक 17 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. नितीन पंडित ढगे (रा. लोहारा, जि. धाराशिव) असे या मृत जवानाचे नाव आहे. जीवन संपवण्यामागे काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नितीन ढगे हे लोहारा (जि. धाराशिव) येथील रहिवासी होते आणि सध्या परळी वैजनाथ येथे लोहमार्ग पोलीस (GRP) दलात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये ते नोकरीस लागले होते. त्यांनी परळीतील माधवबाग परिसरातील एका 'प्ले रूम'मध्ये (खेळायची खोली) गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

नितीन यांचा विवाह अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता. ७ मे रोजी त्यांचा विवाह संपन्न होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच, नितीन यांनी अचानक हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT