Beed News : आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २९ दुचाकी केल्या जप्त file photo
बीड

Beed News : आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २९ दुचाकी केल्या जप्त

बीड पोलिसांची मोठी कारवाई; पाच जिल्ह्यांतील १५ गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

Inter-district two-wheeler theft gang busted; 29 bikes seized

बीड, पुढारी वृत्तसेवा : एक विना क्रमांकाची मोटारसायकल दिसताच पोलिसांना चोरीचा संशय आल्याने पथकाने गणेश सुदाम बहीर (रा. पांढरवाडी) याला थांबवले आणि चौकशी केली. त्याने सदरील मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगून त्याचा मित्र वैभव खेडकर याने ती चोरी केलेली असून त्याने इतर १४ चोरी केलेल्या मोटारसायकली देखील विक्री करण्यासाठी दिल्याचे पोलिसांना सांगितले.

एवढेच नव्हे तर प्रत्येक मोटारसायकल विक्री मागे पाच हजार रुपये देणार असल्याचेही वैभवने मला सांगितल्याचे गणेश बहीर याने पोलिसांना सांगितले. केवळ पाच हजार रुपयांसाठी तो चोरीच्या मोटारसायकली विकायचा मात्र नंबर नसल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना गजाआड करून त्यांच्याकडील चोरीच्या २९ मोटारसायकली जप्त केल्या.

गेवराई उपविभागीतील सिरसदेवी येथे पेट्रोलिंग करतांना गणेश सुदाम बहीर हा विना नंबरच्या मोटारसायकलसह दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरील मोटारसायकल चोरीची असल्याची सांगून मित्र वैभव बाबासाहेब खेडकर (रा. माही जळगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर) याने मला विकायला दिल्याचे सांगितले.

पोलिसांनी गणेश बहीर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १४ चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. पोउपनि विघ्ने यांचे पथक आरोपी वैभव खेडकर याचा शोध घेण्यासाठी माही जळगावला गेले होते. तेथून वैभव खेडकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता बीड, अहिल्यानगर, पुणे, पुणे शहर, ग्रामीण, सांगली व सोलापूर ग्रामीण येथून वेगवेगळ्या कंपनीच्या २९ मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यापैकी १४ मोटारसायकली गणेश बहीर याला विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. तर स्वत:जवळ १५ मोटारसायकली होत्या.

पोलिसांनी बहीर आणि खेडकर या दोघांकडून १४ लाख ९० हजार रुपयांच्या २९ मोटारसायकल जप्त केल्या. यातील आरोपी गणेश खेडकर या सराईत गुन्हेगार असून जामखेड येथे मोटारसायकल चोरीच्या ३० गुन्ह्यांत आरोपी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT