गेवराईत शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; तीस लाखांचे नुकसान file photo
बीड

गेवराईत शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; तीस लाखांचे नुकसान

गेवराई शहरातील ताकडगाव रोड परिसरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून चार विविध दुकाने जळून खाक झाली.

पुढारी वृत्तसेवा

In Gevrai, a short circuit caused a fire in four shops; resulting in losses worth thirty lakhs

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहरातील ताकडगाव रोड परिसरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून चार विविध दुकाने जळून खाक झाली. या आगीत जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

ताकडगाव रोडवरील संविधान किराणा दुकान (आशा सुंदर काळे), समाधान एम्पोरियम (रेखा सुंदर काळे), साई प्रेमचंद पार्लर (सुंदर बाबासाहेब काळे) आणि कानगुडे - सायकल मार्ट (सुरेश कानगुडे) ही दुकाने एकमेकांना लागून आहेत. रविवारी रात्री दुकाने बंद करून सर्वजण घरी गेले होते.

सोमवारी मध्यरात्री प्रथम कानगुडे सायकल मार्ट या दुकानाला आग लागल्याची माहिती परिसरातील एका नागरिकाने सुंदर काळे यांना दिली. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील इतर तीन दुकानांनाही वेढा घातला होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यामुळे परिसरातील इतर दुकाने व मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या आगीत संविधान किराणा दुकानाचे सुमारे १५ लाख, समाधान एम्पोरियमचे १० लाख, साई प्रेमचंद पार्लरचे २ लाख तर कानगुडे सायकल मार्टचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बी. डी. डोळस व सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT