गेवराईत ज्वारीच्या शेतात गांजाची लागवड 
बीड

Beed Crime : गेवराईत ज्वारीच्या शेतात गांजाची लागवड, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई पोलिसांची कारवाई, एकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : तालुक्यातील सुशी (वडगाव) परिसरातील शेतातून ५,८०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत १ लाख ७४ हजार रुपये आहे. गेवराई पोलिसांनी बुधवारी (दि.२४) ही कारवाई करत एकाला अटक केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गेवराई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुशी (वडगाव) येथील गट क्रमांक २३४ मधील शेतात ज्वारीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शेतात छापा टाकून पाहणी केली असता, ज्वारीच्या पिकामध्ये गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी एकूण ४२ झाडे जप्त केली असून, त्याचे एकूण वजन ५,८०० ग्रॅम इतके आहे. याप्रकरणी भाऊसाहेब तात्याबा तुरूकमारे (वय ६०, रा. सुशी वडगाव, ता. गेवराई, जि. बीड) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्धात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, फॉरेन्सिक पथक तसेच कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT