Beed Crime : बीड जिल्ह्यातच अवैध धंदे बेधडकपणे सुरू File photo
बीड

Beed Crime : बीड जिल्ह्यातच अवैध धंदे बेधडकपणे सुरू

केज तालुक्यात सहा जुगार अड्ड्यांवर कारवाई; प्रशासनाचा दरारा कमी?

पुढारी वृत्तसेवा

Illegal businesses are operating in Beed district itself.

केज, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील खमक्या नेतृत्वासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसेल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र केज तालुक्यात जुगार, मटका आणि चोरटी वाळू वाहतूक यांसारखे अवैध व्यवसाय बेधडकपणे सुरू असल्याने पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या प्रशासनिक दडपशाहीची धारही कमी झाली असल्याची चर्चा नागरिकांत जोर धरू लागली आहे. नुकतेच रुजू झालेले आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी हद्दीतल्या अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. १४ नोव्हेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि युसुफवडगाव ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली केज व युसूफवडगाव हद्दीत सहा जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्यात आली.

या प्रकरणी लक्ष्मण घुले, बळीराम चाटे, समीर शेख, अशोक काटकर, रघुनाथ चिंचकर, बाबू गोरखे, मसु काळे, बाळासाहेब गायकवाड, ढाकणे, धस, गायकवाड, शेख, अजय आलाट, गणेश, दयानंद हिरवे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

गंगा माऊली साखर कारखाना परिसर, तांबवा, येवता, वीएसएनएल टॉवर मागील शाळेजवळ, नांदूरघाट व कळंबअंबा या ठिकाणी झालेल्या कारवाईत रोख रुपये ७५ हजार, मोटारसायकली/ स्कूटर ५, मोबाईल व जुगार साहित्य एकूण मुद्देमाल २.८० लाख, ताब्यात घेण्यात आला.

अवैध धंदे करणाऱ्यांना त्वरित जामीन मिळतो, ही मोठी अडचण आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारी कायदा लागू करावा, अशी मागणी जोर धरत असून राजकीय इच्छाशक्ती असल्यासच अशी कारवाई होऊ शकते, तसेच या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळेच पोलिसांना काही मर्यादा पडत आहेत. सततच्या तक्रारी, खुलेआम चालणारे मटका जुगार आणि त्यावरील अपुरी कारवाई पाहता एसपी नवनीत कांवत यांच्या नेतृत्वावर टीका होत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे वाढत असताना पोलिस प्रशासनाची पकड सैल झाल्याची चर्चा बळावत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT