केजमध्ये तीन लाखांचा गुटखा, तंबाखू पकडली file photo
बीड

Beed News : केजमध्ये तीन लाखांचा गुटखा, तंबाखू पकडली

सहायक पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gutkha and Tobacco Worth Three Lakhs Seized in Kaij

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील शिरपुरा येथे सहायक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांच्या पथकाने गुटख्यावर कारवाई करून स्कॉर्पिओ गाडीसह ११ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

६ मे रोजी सहायक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांना अशी माहिती मिळाली की, शिरपुरा ता. केज येथील शिवारात महादेव रत्नाकर घुले याने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला व राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत पान मसाला, सुगंधीत तंबाखुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठा करून ठेवलेला आहे.

माहिती मिळताच आय पी एस अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांनी त्यांचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर यांना कारवाईचे आदेश दिले, आदेश मिळताच पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल बालासाहेब डापकर, पोलिस कॉन्स्टेबल राजू गुंजाळ, महिला पोलिस कॉन्स्टेबल राधा चव्हाण हे दोन पंचासह खाजगी वाहनाने शिरपूरा शिवारात रवाना झाले.

व्यंकटराम यांच्या पथकाने शिरपुरा गावाच्या पश्चिमेस, शिरपुरा ते काळेगांव जाणारे रोडचे उत्तर बाजुस मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता महादेव घुले यांची पत्नी घरी होती. पोलिसांनी त्या घराची झडती घेतली असता घरातील पाठीमागच्या रुममध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व तंबाखू आणि एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ११ लाख ८ हजार ३९२ रु. चा मुद्देमाल जप्त केला.

पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर यांच्या फिर्यादी वरून महादेव घुले याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल बालासाहेब डापकर, पोलिस कॉन्स्टेबल राजू गुंजाळ यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल मंदे, संतोष गित्ते, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे, अशपाक इनामदार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास संदीप मांजरमे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT