Beed Fraud News : जादा परताव्याचा लोभ महागात; ६६ लाखांची झाली फसवणूक (File Photo)
बीड

Beed Fraud News : जादा परताव्याचा लोभ महागात; ६६ लाखांची झाली फसवणूक

केज मधील नऊ जणांना ६६लाख ७० हजार रु ची फसवणूक झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Greed for higher returns; 66 lakhs fraud

केज, पुढारी वृत्तसेवा: रिअल इस्टेट मध्ये काम करीत असलेल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा दराने परतावा देण्याचे आमीष दाखवून केज मधील नऊ जणांना ६६लाख ७० हजार रु ची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अहिल्या नगर येथील ब्रिक्स सोल्युशन कंपनीचे मालक आणि त्यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचे सांगून फसवणूक करणारा केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील येथील एक यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०२२ मध्ये केज येथील समता नगर केज येथील अजय बबनराव मिसाळ याने त्यांचे गल्लीत राहात असलेला बाळासाहेब सखाराम चौरे (रा. जिवाचीवाडी ता. केज) आणि निलेश काळे याचेकडुन पुणे येथील ब्रिस्क सोल्यूशन, मोशी, जि. पुणे या कंपनीचे मालक प्रशांत राधा कृष्ण होन (रा. कोल्हार ता. राहता जि. अहिल्यानगर) यांची ओळख झाली.

प्रशांत होन व बाळासाहेब चौरे याने अजय मिसाळ यांना सांगितले की, त्यांची ब्रिस्क सोल्यूशन हि कंपनी पुण्यामध्ये रिअल इस्टेटचे काम करते. या कंपनीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर एक वर्षा नंतर चांगल्या प्रकारचा परतावा भेटेल.

कपंनीने पुण्यामध्ये बांधकाम केलेल्या फ्लॅट पैकी एक वन बी.एच. के. फ्लॅट तुम्हाला भेटेल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून अजय मिसाळ आणि निखील अनिलराव काळे, विश्वजीत नवनाथ बारगजे, हरिभाऊ बहीरे, अजहर अश्रफ शेख, भागवत काशीनाथ काळे, अमोल बबनराव मिसाळ, अभय मोहनराव शिंदे, अनंत मिसाळ यांनी वेगवेगळ्या बँकेतून ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविले.

त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये पैसे परत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केली आणि प्रत्येक वेळी पुढची तारीख सांगत होते. त्यांची चौकशी केली असता ते दोघे कंपनी बंद करून दुबईला गेले असल्याचे समजले तसेच जानेवारी २०२५ मध्ये प्रशांत होन, बाळासाहेब चौरे यांच्या विरुद्ध करमाळा येथे असाच गुन्हा दाखल झाल्याचे माहीत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT