Govindpur ZP school pudhari photo
बीड

Beed News: दीड वर्ष शाळेत फिरकलाच नाही शिक्षक; माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर येथील प्रकार

माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक दीपक भालेराव हे गेल्या दीड वर्षांपासून नियमितपणे शाळेत गैरहजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Beed News

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक दीपक भालेराव हे गेल्या दीड वर्षांपासून नियमितपणे शाळेत गैरहजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षकांच्या दीर्घकाळ गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचा आरोप, ग्रामस्थांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी असताना संबंधित शिक्षक दीर्घकाळ शाळेत उपस्थित राहत नसल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून शिक्षकावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेल्या दीड वर्षातील संबंधित शिक्षकाची उपस्थिती तपासण्यासाठी हजेरी रजिस्टर, रजा अर्ज, ऑनलाइन अथवा बायोमेट्रिक उपस्थिती नोंदी, वेतन बिले तसेच सेवा नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. गैरहजेरीचा कालावधी अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या कालावधीतील वेतनाबाबतही नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळेत तातडीने पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत दैनिक पुढारीने गटशिक्षणाधिकारी कल्पेश दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "मी नव्याने रुजू झालो असल्याने मला या प्रकरणाची फारशी माहिती नाही. परंतु संबंधीत शिक्षकावर कारवाई केंद्रप्रमुखांकडून अहवाल मागवून केली जाईल," असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT