परमिट मिळाले, हरभरा बियाणे मिळेना! परळीतील शेतकरी अडचणीत; आंदोलनाचा इशारा file photo
बीड

Beed News : परमिट मिळाले, हरभरा बियाणे मिळेना! परळीतील शेतकरी अडचणीत; आंदोलनाचा इशारा

महाबीजच्या कारभारावर शेतकरी नाराज; रुमणे हातात घेऊन आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Got the permit, but didn't get gram seeds! Farmers in Parli in a bind; threaten to protest

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी ऑनलाइन नोंदणी करून शासनाकडून परमिट मिळाले; मात्र प्रत्यक्षात बियाणेच उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परळी शहरातील तीन दुकानांवर हरभरा बियाण्यांचा साठा नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. महाबीजकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

आधीच दुष्काळामुळे खरीप हंगामात आर्थिक नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. मात्र, पेरणीचा हंगाम सुरू असताना बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परमिट देऊनही बियाणे उपलब्ध होत नसेल, तर पेरणी कशी करायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

हरभरा पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असल्याने बियाणे उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच खरीप हंगामाने निराशा केलेली असताना रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

"ऑनलाइन नोंदणी करून परमिट दिल्यानंतर प्रत्यक्ष बियाणे पुरवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने पार पाडली पाहिजे. महाबीजने तातडीने पुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रुमणे हातात घेत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल."
ॲड. जीवन देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT