बीड

धनगर आरक्षणासाठी आता रस्त्यावरील लढाई लढणार : गोपीचंद पडळकर

दिनेश चोरगे

बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण जागरण यात्रेला येल्डा येथून गुरुवारी सुरुवात केली. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणात समावेश करण्याचा निर्णय झाला नाही, तर रस्त्यावरील लढाई लढावी लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

पडळकर यांनी काढलेली ही धनगर जागरण यात्रा 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणार आहे. न्यायालयातून धनगर आरक्षण मिळवून त्याची अंमलबजावणी करणे हा आमचा प्लॅन ए आहे. त्यात काही अडचण आली, तर रस्त्यावरची लढाई हा आमचा प्लॅन बी असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाज एकत्र येतो तेव्हा प्रस्थापितांच्या पोटात दुखायला लागते. आरक्षणासाठी जात आणि पक्ष विसरून आपल्याला एकत्र यायचे आहे. प्रस्थापितांच्या विरोधात एक मोठा लढा उभा करायचा आहे.

 राज्यातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष करत आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजालाही अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटी आरक्षण देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यावर डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT