बीड

Gopichand Padalkar | छगन भुजबळ यांनी सिंहाची डरकाळी फोडली आहेः आमदार गोपीचंद पडळकर

आम्ही आमचा हक्क घेणारचः बीड येथे ओबीसी महायल्गार सभा

Namdev Gharal

बीड: आज आपल्या अधिकारांवर, हक्कांवर गदा येत आहे. दोन वर्षापूर्वी बोलायची हिंमत होत न्हवती मात्र छगन भुजबळ यांनी आज सिंहाची डरकाळी फोडली आहे. त्‍यांच्या पाठिशी राहून आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही असा यल्गार आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला. बीड येथे आयोजित आबीसी समाजाच्या महायल्गार सभेत पडळकर बोलत होते.

दरम्यान आजच्या या सभेला मंत्री छगन भूजबळ यांच्यासह, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपिचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातून ओबीसी नेते हजर होते. सभास्थळी पोहचल्यावर क्रेन ने भलामोठा हार घालून मंत्री भूजबळ यांचं जंगी स्वागत करण्यात आले.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले. मी पश्चिम महाराष्ट्रातून आलोय, क्रांतिसिंह नाना पाटील लोकसभेत हरले मात्र या भूमीने त्यांना लोकसभेत पाठवले होते याचा मला अभिमान आहे. ओबीसी हक्कासाठी दुसरी सभा बीडमध्ये होत आहे.आज सर्वांनी भुजबळ यांच्या पाठीमागे राहण्याची गरज आहे. आणि आमच सगळ्यांचं ठरलं आमचा नेता एकच आहे छगन भुजबळ. आणि त्‍यांच्या पाठिशी आम्ही सर्वजण एकजूटीने उभे राहू. छगन भुजबळ ठरवतील ती दिशा सर्वांना मान्य राहील.

प्रत्येकवेळी आपल्याकडे बाण येईल असे नाही ,कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो.आता इथे भुजबळ साहेब अर्जुन आहेत आम्ही कार्यकर्ते. आमच्यात फूट पाडण्यासाठी धनगराना एस टी आरक्षण दाखवले आहे पण धनगर वेडे नाहीत. - धनगर रस्त्यावर आणि न्यायालयात लढाई लढूच पण ओबीसी आरक्षणाची लढाई लढण्याची देखील तयारी धनगरांची आहे. अशा शब्द पडळकरांनी दिला.

लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करणार म्हणतो बंजारा समाजाला आरक्षण द्या. आमच्या बरोबर बसायला कमी पण वाटत नाही का? गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही नाही.आम्ही वेगळ्या आरक्षणाचे समर्थन करतो. चार दिवसापूर्वी धर्माचा विषय होता म्हणून बीडमध्ये आलो होतो, आज जातीचा विषय आहे,ओबीसींचा विषय आहे म्हणून आलोय ,पुढेही येणार असाही निर्धार व्यक्त केला

पुढे ते म्हणाले शासनाच्या जीआर ची चिंता करू नका, अजून कुणाला सर्टिफिकेट मिळाले नाही.पुढेही मिळणार नाही. जो कुणी खोटा दाखला कुंनबीचा देईल त्याला जेलमध्ये टाका. पूर्वी खोट्या कागदपत्रांवर कुणबी प्रमाणपत्र बनविले आहे. नाशिक पुणे येथे खोट्या प्रमाणपत्रावर अनेकजण नगरसेवक आहेत. 17 जिल्ह्यात 5 कोटी मराठे म्हणता कुठले कॅलक्युलेटर आहे. जेव्हा जात निहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठेल. असा इशराही पडकर यांनी शेवटी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT