Crime News file photo
बीड

Gevrai News : ब्रह्मगावात मंदिरासमोर मांस फेकल्याने तणाव, परिस्थिती नियंत्रणात

घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पुढारी वृत्तसेवा

Gevrai News: Tension in Brahmagaon After Meat Thrown in Front of Temple; Situation Under Control

गेवराई : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील ब्रह्मगाव येथे शुक्रवारी सकाळी मारुती मंदिरातील मूर्तीसमोर अज्ञात समाजकंटकाने मांस फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गावात सर्व जाती-धर्मातील नागरिक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत असताना, जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे कृत्य करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिक चकलांबा पोलीस ठाण्यात जमा झाले होते.

दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेचा सर्व बाजूंनी कसून तपास केला जात असल्याची माहिती चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन इंगळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT