बीड

Geverai Municipal Council | गेवराई नगरपरिषदेत बिनविरोध निवडी; भाजपची ताकद अधिक भक्कम

Geverai Municipal Council | भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेल्या या निवडीत रेवती भगवानराव घुंबार्डे यांची गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : पुढारी वृत्तसेवा

गेवराई नगरपरिषदेत आज महत्त्वपूर्ण बिनविरोध निवडी पार पडल्या. आदरणीय लोकनेते माजी मंत्री बाळराजे दादा पवार, लोकनेते माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित तसेच नगराध्यक्षा गीताभाभी बाळराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेल्या या निवडीत रेवती भगवानराव घुंबार्डे यांची गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच विजय (मुन्ना भैया) मोटे आणि आबासाहेब काकडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीमुळे गेवराई नगरपरिषदेत भाजपची ताकद आणखी भक्कम झाल्याचे चित्र आहे. शहराच्या विकासासाठी येत्या काळात अधिक सकारात्मक, गतिमान आणि लोकाभिमुख काम होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित उपाध्यक्ष रेवती घुंबार्डे तसेच स्वीकृत नगरसेवकांनी मिळालेल्या संधीबद्दल आभार मानत, गेवराई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT