गेवराई : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर २९ तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या लाखो बांधवांसाठी गेवराई तालुक्यातील तळणेवाडीतून आझाद मैदानाकडे एक टॅम्पो भाकरी, चटणी ठेचा तसेच लोणचं ही शिदोरी पोहोच करण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे लाखो समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान मुंबईत सर्वत्र मराठा समाज बांधव दिसत असल्याने या बांधवांची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. मनोज जरांगे पाटलांनी आवाहन करत माझ्या बांधवांचे हाल झाले नाही पाहिजेत, त्यांना गाव खेड्यातून मदत झाली पाहिजे असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथून उपोषण स्थळी एक ट्रॅम्पो भाकरी ,चटणी, लोणचे, तेल, पापड आदींची शिदोरी रात्रीतून मुंबईला पोहोच करण्यात आली आहे. यामुळे तळणेवाडीकराचे आभार व्यक्त केले जात आहेत.
यासाठी संदीप धस, विक्रम भोसले, जालिंदर धस, शरद धस, संतोष धस ,सुखदेव शिंदे, धर्मराज झेंडे ,धुराजी धस यांसह गावकऱ्यांनी यशस्वी नियोजन केले.