बीड : आज जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये बीड जिल्ह्याच्या चार भूमिपुत्रांनी यश मिळवले आहे. परळी तालुक्यातील अक्षय मुंडे, पाटोदा तालुक्यातील डॉ.पंकज आवटे, बीड मधील डॉ.सुशील गीते, तर गेवराईचा आकाश गोरे यांचा यामध्ये समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये बीड जिल्ह्यातील चार जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये परळी तालुक्यातील गोपीनाथ गड परिसरात राहणार अक्षय संभाजी मुंडे, पाटोदा तालुक्यातील डॉ. पंकज आवटे, गेवराई येथील शारदा विद्या मंदिराचा विद्यार्थी आकाश पुंजाराम गोरे व बीड येथील डॉक्टर सुशील सूर्यकांत गीते यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष बाब म्हणजे डॉ. सुशील गीते याची बहिण देखील आयएएस उत्तीर्ण झालेले असून ती सध्या जिल्हाधिकारी म्हणून गोवा राज्यात कार्यरत आहे. उत्तीर्ण झालेल्या चारही जणांचे अभिनंदन केले जात आहे.