Bhimrao Dhonde : मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही  File Photo
बीड

Bhimrao Dhonde : मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही

माजी आमदार भीमराव धोंडे यांचे आ. सुरेश धस यांना प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

Former MLA Bhimrao Dhonde's reply to MLA Suresh Dhas

कडा, पुढारी वृत्तसेवा" मी आमदार झाल्यानंतर कारखान्याचा परवाना रद्द केला, "असा आरोप आ. सुरेश धस यांच्यावर केला होता आजवर त्यांच्या संस्थेतील कारभारातील गैरव्यवहारांबाबत कधी ही लक्ष घातले नाही, परंतु आता त्यांच्या सर्व संस्थांतील अनियमितते बाबत लक्ष घालावे लागेल, असा इशारा आ. धस यांनी दिला असताना आज आनंद भवन येथे आयोजित केलेल्या परिषद आयोजित केली होती.

यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले "मी अशा प्रकारच्या धमक्यांना भोक घालत नाही. कोणतीही चौकशी करायची असेल तर जरूर करा, असा जोरदार प्रत्तिउत्तर दिले उलट मतदारसंघाच्या विकासकामात सहभागी व्हा. शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी कामे करा, हा माझा सल्ला आहे. उलट तुम्ही दोन वर्षे सुपर टेक फोर्जिंग कंपनीच्या माध्यमातून कारखाना चालविला त्यावेळी कार्यरत असलेल्या कामगारांचे पीएफ पैसे घ्यावेत कारखाना तुम्ही चालविला अन तत्कालीन संचालक मंडळाला ३ कोटी २८ लाख रुपये भाडे द्यावे लागले.

पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले की ८ एप्रिल २०२४ ला परवाना रद्द झाला त्यावेळी संचालक मंडळ नव्हते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी नवीन संचालक मंडळाला मान्यता दिली पुढे बोलताना म्हणले की कामगाराचा पगार बॅलन्सशीट नुसार २ कोटी ६४ लाख रुपये आहे परंतु काही विघ्नसंतोषी मंडळीने चुकीचे माहिती दिली आहे. सध्या कॅन्सर रुग्ण झपाट्याने वाढत आहेत...

त्यासाठी उपचार करण्यासाठी मुंबई पुण्याला सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही त्यामुळे मराठवाड्यात एखादं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे. त्यामुळे कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी कर्मचारी वर्गाने दिलेल्या आर्थिक मदतीचे कौतुक करत, विद्यमान आमदारांना आवाहन करण्यात आले की, "या पवित्र कार्यासाठी आमदार निधीतूनही मदत द्यावी, तसेच आपल्या सरकारलाही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून विकास कामात सहभागी व्हा. असा खोचक सल्ला भीमराव धोंडे यांनी दिला आहे.

शेख सिकंदर हा चांगला मल्ल

सिकंदर शेख हा कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा असून, त्याने अनेक स्पर्धांमध्ये राज्याचे देशाचे नाव उंचावले आहे. मात्र, अशा गुणी खेळाडूला विनाकारण अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, तो एक सरळ, मेहनती व खेळावर प्रेम करणारा तरुण आहे. त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला अडकविण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्याला न्याय मिळवून द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT