केज शहरातील मंगळवार पेठेत पाच दुकाने आगीत भस्मसात file photo
बीड

केज शहरातील मंगळवार पेठेत पाच दुकाने आगीत भस्मसात

खत आणि मोटार रिवाइंडिंगच्या दुकानाचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Five shops gutted in a fire in Mangalwar Peth, Kej city

गौतम बचुटे/केज :- केज शहरातील मंगळवार पेठेतील पाच दुकानांना आग लागून खत आणि बी बियाण्यांच्या दुकानासह मोटार रिवाइंडिंग, पशु खाद्य आणि हॉटेलसह इतर तीन दुकाने जळून मोठे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आज ११:३० वाजता मंगळवार पेठ केज येथील अनिल अशोक सूर्यवंशी यांचे गजानन अॅग्रो एजन्सी या कृषी सेवा केंद्राला अचानक आग लागून दुकानातील किटक नाशक, तन नाशक, विद्राव्य खते, लिंबोळी पेंड आणि दुकानातील फर्निचर असे मिळून १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच या आगीमुळे त्यांच्या शेजारी असलेले खंडेश्वर पशु खाद्य ट्रेडर्स, प्रकाश मुंडे यांचे मोटार व इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीचे दुकान आणि नारायण नेहरकर यांचे चहाच्या दुकानासह दत्ता देशमुख यांचे दत्तात्रय फोटो स्टुडिओला सुद्धा या आगीमुळे नुकसान पोहोचले आहे. मोटार दुरुस्ती, चहाचे हॉटेल आणि पशु खाद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती :- या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

माहिती मिळताच बंब घटनास्थळी :- आगीची माहिती मिळताच केज नगरपंचायतीचा अग्निशामक बंब घटनास्थळी हजर झाला आणि कर्मच्यांनी आग आटोक्यात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT