Fight between women over house sale in Nandur Ghat
केज, पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील नांदुरघाट येथे घराच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून महिलांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी घडली. या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गावातील लोकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आले आहे.
बाळू दळवी यांनी तीन महिन्यांपूर्वी आपले घर दगडू सामसे यांना २२ लाख रुपयांत विकले होते. घराची नोंद सामसे यांच्या नावे झाल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ताबा देण्याचे ठरले होते. मात्र, दळवी कुटुंबाने ताबा देण्यास नकार देत व्यवहार माघारी घेण्याची भूमिका घेतली. दुसरीकडे, सामसे कुटुंबाने दागिने व मुदत ठेवी मोडून पैसे उभे केल्याने ते घराचा ताबा घेण्यावर ठाम होते.
याच कारणावरून ३० ऑक्टोबर रोजी सामसे कुटुंबातील महिला घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता, दोन्ही कुटुंबांतील महिलांमध्ये वाद होऊ-त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीक झाले. या घटनेपूर्वी दोन्ही कुटुंबांन एकमेकांविरुद्ध अदखलपात्र तक्रारी दाखल केल्या होत्या.
अखेर गावातील प्रतिष्ठित नागरिकांन मध्यस्थी करत हा वाद मिटवला तडजोडीनुसार, बाळू दळवी हे सामस कुटुंबाला २५ लाख रुपये, नोंदणी खच्च व इतर नुकसान भरपाई देणार असून घर पुन्हा दळवी यांच्याकडेच राहणा आहे.