गौतम बचुटे : बीड
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका ४४ वर्षीय महिलेचा बाप आणि वडिलांनी मिळून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पीडित महिलेकडे बघून वडिलांनी लघुशंका केली. तर मुलाने हाताने अश्लील चाळे करीत लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. यासोबतच गावात राहू नको म्हणत धमकविल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ४४ वर्षीय विवाहित महिला ही सोमवारी (दि.२९) रात्री ८:०० वाजता गावातील एकाच्या शेता जवळ असताना सहदेव सिताराम घोळवे व त्यांचा मुलगा माधव सहदेव घोळवे (दोघे रा. पिंपळगाव) या दोघां बाप-लेकांनी संगनमत करीत सहदेव घोळवे याने महिलेकडे तोंड करीत लघुशंका केली. तर त्याचा मुलगा माधव घोळवे याने हाताने अश्लील आणि लज्जास्पद चाळे करुन त्या महिलेचा विनयभंग केला. तसेच दोघा बाप-लेकांनी.त्या महिलेला शिवीगाळ करीत तु या गावात का राहतेस ? तु हे गाव सोडुन निघून जा. असे म्हणुन ही धमकावले. अशी तक्रार सदर महिलेने दिल्या वरून सहदेव घोळवे, माधव घोळवे या दोघा बाप-लेकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.